मुखपृष्ठ
Wikipedia कडून
सुस्वागतम्मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. 'विकिपीडिया' हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिपीडिया' मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या १५,७५५ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल. भेट दिल्याबद्दल धन्यवाद! |
मासिक सदरसह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम तटाशेजारी उभी आहे. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी चालू होते आणि अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ पोचते. या पर्वतरांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो. या पर्वतरांगेचे क्षेत्रफळ ६०,००० वर्ग कि.मी. असून या पर्वतरांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे. अनेक उंच शिखरे ही पर्वतरांग सामावून घेते, त्यामध्ये रांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी), महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मी). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. पर्वतरांगेत महत्वाचा खंडभाग पलक्कड खिंडीच्या स्वरुपात आहे जी तामिळनाडू आणि केरळ यांना जोडते. इथे सह्याद्रीची सर्वात कमी उंची आहे (३०० मी). पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणार्या आठ जागांपैकी एक आहे. इथे ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती, १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात. मागील अंक - जानेवारी २००८ - जून २००७ - मे २००७ - एप्रिल २००७ - मार्च २००७ - फेब्रुवारी २००७ - जानेवारी २००७ - डिसेंबर २००६ - ऑक्टोबर २००६ - मे २००६ - फेब्रुवारी २००६ - जानेवारी २००६ - जुलै २००५ - जून २००५ |
|
निवेदन
|